Annabhau sathe

लोकशाहीर म्हणून ओळखले जाणारे अण्णाभाऊ साठे यांचं पुर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. अण्णाभाऊ साठे ह्यांचं जन्म 1ऑगस्ट 1920 ला वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली येथे झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजामध्ये जन्मले होते. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊ सिधोजी साठे आणि आईचे नाव वालबाई होते. त्यांचे शिक्षण झाले नव्हते तरी त्यांनी अक्षरज्ञान मिळवले होते. 1932 साली ते आपल्या वडिलांसोबत मुंबई ला आले. तेथे येऊन त्यांनी अनेक कष्टाची कामे केली. जस कोळसा वेचणे, फेरीवाल्याचे गोठोडे वाहने, मुंबईच्या मोरबाग येथील गिरणी मध्ये झाडूवाला म्हूणन नोकरी त्यांनी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले संम्पुर्ण आयुष्य दिनदुबळ्या, गोरगरीब,शिक्षणापासून व विकासापासून वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी घालवले.
त्यांनी लोकप्रबोधना मार्फत आपले विचार मांडले. Annabhau sathe thoughts.

कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कॅम्युनिस्ट विचारसरणी ने ते खूप प्रभावित झाले, त्यांच्यासोबत ते पक्षाचं काम बघू लागले. त्यानंतर त्यांनी 1944 मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख ह्यांच्यासोबत लालबावटा कला पथक स्थापन केले, नंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून ते दलित समाजाकडे वळले. त्यांच्या कथा मधून दलित व कामगाराच्या जीवनातील अनुभवाला उजाळा दिला.

स्वताच्या दु:खांचा विचार न करता, आपले विचार, आपले कार्य व प्रतिभा जनसामाण्य लोकांपर्यंत पोहचविण्याच काम व लोककलेला प्रतिष्ठा मिळवुन देणारे आणि गरिबांच्या व वंचितांच्या व्यथा प्रभावी व प्रखरपणे  मांडणारे लोकशाहीर, भीमशाहीर व शिवशाहीर अण्णा भाऊ साठे.
 शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या व   जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक विद्वान व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमचे अण्णाभाऊ साठे.

समाजाच्या क्रांतीचा पेटलेला निखारा अन्याया विरुद्ध बंड पुकारणारे थोर समाजसुधारक मातंग समाजाच्या
कल्याणासाठी पेटलेला झंझावात दिवा जगविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १८ जुलै १९६९ रोजी प्राण ज्योत मावळली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लोकप्रिय विचार:- Annabhau sathe thoughts

1) पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.

2) निळ्या रक्ताची धमक बघ,स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नकोस कुणाच्या बापाला,तु भीमाचा वाघ आहे.- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

3) जग बदल घालूनि घाव आम्हा सांगून गेले भीमराव.- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

4) नैराश्य हे धारदार तलवारीवरसाचलेल्या धुळीसारखे असतेधुळ झटकली की ती तलवारपुन्हा धारदार बनते- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

5) जात हे वास्तव आहे,गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येवु शकते पण जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

6) अनिष्ट धर्माचा आचरणाने मानसांना हीन समजणे हा धर्म नसून रोग आहे- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

7) यह आझादी झूटी है,देश की जनता भुखी है.- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

8) तु गुलाम नाहीस तु तर ह्या वास्तंव जगाचा निर्माणकर्ता आहे.

अण्णाभाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट -:

  1. वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
  2. टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
  3. डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
  4. मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
  5. वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
  6. अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
  7. फकिरा (कादंबरी – फकिरा)

अण्णाभाऊ साठेंनी लिहिले लोकप्रिय साहीत्य :-

कांदबऱ्या : फकीरा,अलगुज, वारणेचा वाघ,आघात,गुलाम,चिखलातील कमळ,

कथासंग्रह: कृष्णकाठच्या कथा, गजाआड, फरारी, निखारा, पीसाळलेला माणुस

नाटके:  सुलतान, इनामदार, पेंग्याच लगीन.

प्रवास वर्णन: माझा रशियाचा प्रवास.

पुस्तक: शाहीर,

काव्ये -: पोवाडे आणि लावण्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *