Aurangabad corona news औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे शासनाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी 15 ते 25 सप्टेंबर पर्यंत माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत आदेश दिले आहेत, त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने तयारी सुद्धा सुरू केली आहे. मंगळवारी पासून प्रत्येक घरी जाऊन आरोग्य कर्मचारी नागरिकांची कोरोना चाचणी करणार आहे .
औरंगाबाद महापालिकेने यापूर्वी दोन वेळेस अशाच पद्धतीने रुग्णांची तपासणी केली आहे . राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे, या तपासणी द्वारे नागरिकांचा ताप आहे का ? ऑक्सिजन चे प्रमाण किती आहे ? हे बघण्यात येणार आहे दररोज एका पथकाने किमान 50 घराची तपासणी करणे अनिवार्य आहे असे शासनाने ठरवून दिले आहे . Aurangabad corona news
महानगरपालिकेच्या तपासणी पथकामध्ये आरोग्य विभागाला एक कर्मचारी आणि संबंधित लोकप्रतिनिधी ने दिलेले दोन स्वयंसेवक असतील. एका आरोग्य केंद्राअंतर्गत किती घरे येऊ शकतात त्यासाठी महापालिकेला किती पथके तयार करावे लागतात याचे गणित सुद्धा शासनाने ठरवून दिले आहे. एखाद्या नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात लक्षणे आढळून येत असेल तर त्याला त्वरित क्लिनिक मध्ये भरती करण्यात यावे व एखाद्या रुग्णाला विविध आजार असतील तर त्या आजाराशी संबंधित औषधे वेळेवर घेत येत आहे का नाही हे सुद्धा पथकाने खात्री करून घ्यावी. पालिकेने शासनाच्या आदेशानुसार तत्वे तयार केले आहे. सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांला प्राथमिक प्रशिक्षण देऊन तपासणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे
हे पण वाचा ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी ‘ ही मोहीम राबवणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे