Aurangabad

Aurangabad शहर लॉकडाऊन च्या दिशेने

शहरातील वाढत्या कोरोना संसर्ग संदर्भात व दिवसेंदिवस गंभीर होत असलेली परिस्थिती याचा सगळा विचार करून औरंगाबादेत लॉकडाऊन करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पोलीस आयुक्त मनपा आयुक्त यांची रविवारी सायंकाळी बैठक होऊन यावर निर्णय होणार त्यानंतर औरंगाबाद शहरामध्ये लॉकडाऊन करायचे की नाही, यावर निर्णय होणार आहे Aurangabad

मागच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले होतेच अनेक दिवस जनजीवन ठप्प झाले होते कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जनजीवन सुरळीत झाले परंतु औरंगाबादेत गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.

लॉकडाउनच्या चर्चने नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली लॉकडाऊन च्या काळातील अडचणी लक्षात येतात किराणा दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करताना नागरिक दिसून आले तर दुसरीकडे जिल्ह्यात लॉकडाऊन लावायला व्यापारी वर्गाने विरोध दर्शवला आहे. Aurangabad

जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज रविवारी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये कोरोना रुग्ण संख्या कोणत्या भागात संसर्ग जास्त आहे त्या ठिकाणी नागरिकांकडून नियम पाळले जात आहे की नाही याची चर्चा होणार आहे. सॅनिटाझर, मास्क चा वापर होत आहे की नाही यावर चर्चा होणार आहे त्यानंतर लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेनार आहे.

हे पण वाचा : Safari park च्या कामाला लागला अखेर मुहूर्त

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *