Before the school starts, all the teachers will be tested

शाळा सुरू होण्यापूर्वी होणार सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी

23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी चे वर्ग सुरू होत आहे त्या अगोदर राज्यातील सर्व शिक्षकांची कॉविड चाचणी होणे अनिवार्य आहे . 17 ते 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे , पण शिक्षकांमध्ये ह्यामुळे भीती च वातावरण निर्माण झाले आहे. पण सुमारे सहा लाख शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाची चाचणी कशी करायची हा मोठा प्रश्न सरकार पुढे उभा आहे.

जून पासून सर्व वर्गाचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होत ,पण सध्या कोरोनाच प्रसार कमी झाला असून त्यामूळे नववी ते बारावी पर्यंत वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय विभागाकडून घेण्यात आला आहे. 17 ते22 नोव्हेंबर पर्यंत कोरोना चाचणी करण्यासाठी आरटी पीसीर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे शिक्षक व इतर कर्मचारी या चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाला सादर करावे लागणार आहे . प्रमाणपत्राची पडताळणी शाळेने करावी आणि त्यानंतर त्यांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा असे त्यात नमूद करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना शाळा व आणि शाळेतील परिसरात येता येणार नाही , डॉक्टरांनी प्रमाणिक केल्यानंतरच त्यांना शाळेत उपस्थित राहण्याची मुभा दिली जाणार आहेत यासाठी सर्व जबाबदारी सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.

ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असतील त्यांनी शाळेत उपस्थित राहता येईल आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहिल शिवाय अहवाल आल्यानंतर जर काही शिक्षका मध्ये कोरोना बाबत ची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी असे सूचनांमध्ये म्हटले आहे. तरीही सर्वाना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे . सोशल डिस्टनिंग च पाळणं गरजेचं आहे. मिशन बिगेन अंतर्गत राज्यातील सर्व शाळा टप्या टप्यात सुरू करण्यात येणार आहे.23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहे .17 ते 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे , पण शिक्षकांमध्ये ह्यामुळे भीती च वातावरण निर्माण झाले आहे. पण सुमारे सहा लाख शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाची चाचणी कशी करायची हा मोठा प्रश्न सरकार पुढे उभा आहे.23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी चे वर्ग सुरू होत आहे त्या अगोदर राज्यातील सर्व शिक्षकांची कॉविड चाचणी होणे अनिवार्य आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *