Corona vaccine

Corona vaccine |फक्त एवढ्या रुपयात मिळणार कोरोनाची लस

कोरोना ने आज सर्व जगात हाहाकार पसरवला आहे.कोरोना विषाणु च्या संक्रमणातुन मोठ्या प्रमाणात लोक बाहेर येत असले तरी मृतांचा आकडा हा वाढतच चालला आहे. देशातील तज्ज्ञ लोक कोरोना विषाणू चा प्रभाव कमी करण्यासाठी त्यावर औषधं शोधण्यासाठी अहोरात्र झटत आहे. Corona vaccine कधी येईल ह्या कडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर लस तयार ह्यावी आणि ती नागरिकांना मिळावी ह्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कोरोना विषाणु वरील लस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मास्क वापरावा, एक ते तीन मीटर अंतर ठेऊन लोकांशी संपर्क साधावा, तसेच साबण किंवा सॅनिटायझर ने हात स्वच्छ धुवावे.

भारतातमध्ये सुरक्षित लस तयार करण्यासाठी अनेक कंपनी चे प्रयन्त सुरु आहे. कमीत कमी किंमती मध्ये लस सर्व जगाला मिळावं हा प्रयन्त भारतातील लस निर्मिती कंपनी करत आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही भारतामधील औषध निर्मितीसाठी आघाडीची कंपनी आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने कोरोना वरील लसीचे उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिटयूट सोबत करार केला आहे.

सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ही जगातील आघाडी ची कंपनी आहे.सिरम इन्स्टिटयूट ही रोगप्रतिकारक औषध निर्माण करणारी कंपनी आहे. Serum institute of india ने GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फॉउंडेशन एकत्र आले आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फॉउंडेशन ने 150 मिलिअन्स डॉलर्स चा निधी लस बनवण्यासाठी दिला आहे. SII कडून AstraZeneca आणि Novavax मधील उमेदवाराच्या लसी साठी मदत केली जाईल परवानगी मिळाली तर हा निधी सिरम इन्सिट्यूट ला दिला जाईल. ऑक्सफर्ड कडून विकसित करण्यात येत असलेल्या लस निर्मिती साठी जगायला खूप अपेक्षा आहे तसेच सिरम इन्स्टिटयूट च्या पूनावाला यांनी लसीचे उत्पादन झाल्यानंतर भारतीयांना ही लस माफक दरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केले आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी असलेल्या सिरम कंपनी ला या देशांना 2021 सुरुवातीला दहा कोटी लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वर असेल तसेच गरज लागल्यास आणखीन पुरवठा केला जाणार आहे.

कोरोना वरील लस $3 डॉलर्स म्हणजे केवळ 225 रुपयाला मिळणार आहे भारतासह जगभरातील अन्य गरीब देशातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. 2021 मध्ये भारतासह अन्य देशांना 10 कोटी डोस उपलब्ध करण्यात येईल. Corona vaccine

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *