Hair care tips in marathi

आज-काल प्रत्येक मुलीला असं वाटतं की तिचे केस लांब सडक, सुंदर व चमकदार असावे. तुमच्यापैकी कित्येक जन केस सुंदर बनवण्यासाठी काही ना काही करत असते बाजारातून महागडे उद्पादने विकत घेता आणि त्याचा वापर सुद्धा करता, पण ते वापरून केस सुंदर तर नाही बनत पण आणखीन रुक्ष होता. महागडे प्रॉडक्ट ना वापरता काही सोप्या घरगुती पद्धतीने आपण आपल्या केसांची योग्य ती काळजी घेऊ शकतो. केस गळणे, कोंडा होणे, पांढरे होणं, केस रुक्ष होणं, ह्या सर्व प्रॉब्लेम मुळे कित्येक जण परेशान असत. केसांना योग्य ते पोषण न मिळाल्यामुळे ह्या समस्या निर्माण होता. काही उपाय सांगणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. Hair care tips in marathi.

Hair care tips

दररोज केस धुणे टाळा

जर तुम्ही दररोज केस धुवत असाल तर तुम्हाला लगेच सावधान होण्याची गरज आहे. दररोज केस धुण्याने तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे तुमचे केस कोरडे पडतात. केस धुण्यासाठी गरम पाणी टाळावे, गरम पाण्यामुळे केस गाळण्याची समस्या होते. केस कोमट किंवा थंड पाण्याने धुवावे. केस धुण्यासाठी साबण चा वापर टाळावा. केसांसाठी शॅम्पू चा वापर करावा. केसांसाठी शॅम्पू निवडतांना तो हर्बल असावा. कारण हर्बल शॅम्पू ची pH लेवल कमी असते.

केसांना तेल लावावे

केसांना नियमित तेल लावणं खूप गरजेचं आहे. तेलांमुळं केस मऊ होता.केस धुण्याच्या तासभर अगोदर केसांच्या मुळापर्यंत तेल लावावे. आदल्या दिवशी तेल लावल तर उत्तम असत. केसांसाठी बदाम तेल, खोबरेल तेल, व्हिटामिन इ, ऑलिव्ह ऑइल उत्तम आहे.

केसाच आरोग्य

केसांचा आरोग्य निरोगी असण्यासाठी आपल अंतर्गत आरोग्य निरोगी असायला हवं. त्यासाठी आपल्या आहारामध्ये पोषकतत्वचा समावेश करावा. केसाच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात प्रोटीन, व्हिटामिन, कॅल्शियम, लोह हयाच समावेश करावा. तुमच्या आहारामध्ये ह्या पदार्थ चा समावेश केला तर तुमच्या केसांचा आरोग्य नक्की सुधारले. हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य, सुकामेवा, अंडी, दूध, मासे ह्याच आपल्या जेवण्यात समावेश करावा. भरपूर पाणी पिला पाहिजे. तसेच नियमित योगा करावा त्याने रक्त भिसरण होण्यास मदत होते. मानसिक ताण तणाव कमी करावा, ताण घेतल्याने आपले अंतर्गत आरोग्य बिघडण्याची समस्या निर्माण होते. तेलकट पदार्थ खाना टाळावे.

केस वाळवण्यासाठी ब्लो ड्रायर व मशीन चा वापर टाळा

केसांना सुंदर बनवण्यासाठी आजकाल खूप जण मशीन चा वापर करता. केस वाळवण्यासाठी ड्रायर चा वापर करता, पण मशीन चा जास्त वापर केल्याने केस आतून कमजोर होता. कोरडे, रुक्ष, राठ होता. त्याची नैसर्गिक चमक कमी होते. कालांतराने केस गळायच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी केसांना नैसर्गिकरित्या वाळू दिला पाहिजे. त्यामुळे केसांसाठी मशीन चा वापर कमी करा. Hair care tips in marathi.

केस विंचरताना घ्याची काळजी

केस तुटण्यापासून वाचायचं असलं तर केस कशे विंचरायला पाहिजे हे तुम्हाला माहित असावा. केस विंचरताना मोठ्या दाताच्या कंगव्याने विंचरावे. छोट्या कंगव्याने केस तुटतात. केस ओले असताना केस विंचरणे टाळावे. केस नैसर्गिकरित्या कोरडे करून टोकापासून केस विंचरावे, असा केल्यामुळे केस जास्त तुटणार नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *