Home remedies for Dark circle in marathi

Dark circle

सुंदर डोळे आपले सौंदर्य आणखीन खुलवते, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात डोळ्याखाली काळी वर्तुळ पडण्याची समस्या वाढत आहे. पुरुषांनासुद्धा ह्या समस्याच सामना करावा लागत आहे. डोळ्या खाली काळी वर्तुळ का येतात? हा सर्वाना सतावणारा प्रश्न आहे.तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आठ तास झोप घेऊन ही माझ्या डोळ्या खाली काळी वर्तुळ का येतात. आपल्याप्रमाणेच अनेक लोकांच समज आहे की झोप पुर्ण ना झाल्यामुळे डोळ्या खाली काळी वर्तुळ येतात. फक्त अपुरी झोप हेच कारण नाही डोळ्या खाली काळे वर्तुळ येण्याच अशी खूप काही कारणे असू शकत डोळ्या खाली काळी वर्तुळ पडण्याची. अधिक ताणतणाव, अपुरी झोप, रात्री उशिरापर्यंत काम, अनुवंशिकता, मद्यसेवन, धूम्रपान ह्या सगळ्या कारणामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात. Home remedies for dark circle in marathi.

डोळ्याखाली काळी वर्तुळ का येतात?

पाण्याची कमतरता

पाणी तुम्हाला निरोगी ठेवत नाही तर तुमची त्वचा चमकते. जेव्हा तुम्ही भरपूर पाणी प्याल तेव्हा शरीरातील विषारी घटक आहे ते बाहेर पडण्यास मदत होईल, त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिल्याने तुमच्या चेहर्‍यावर ओलावा राहतो.

कॉम्प्युटर चा अधिक वापर

कॉम्प्युटर समोर जास्त वेळ काम केल्याने डोळ्याला त्रास होतो, त्याच ताण डोळ्यावर पडतो आणि डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात. डोळ्याजवळील त्वचा खूप नाजूक व पातळ असते, डोळ्याना आराम देण्यासाठी जास्त वेळ कॉम्प्युटर वर काम करणं टाळा.

निरोगी आहाराची कमतरता

जेव्हा अंतर्गत आरोग्य निरोगी असेल त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो चेहऱ्याला तजेलदार ठेवण्यासाठी निरोगी राहण्याचा वर भर दिला पाहिजे. आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. आपल्या आहारात पोषक घटकांचा समावेश करा. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विटामिन्स c युक्त आहार घयावा. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळ याच जास्त समावेश करावा. पौष्टिक भोजन न मिळ्यामुळे डोळ्या खाली काळी वर्तुळे पडतात. Home remedies for dark circle in marathi.

दीर्घकाळापासून आजारी असणे

दीर्घकाळापासून जर आजारी असाल तर अंतर्गत कमकुवतेमुळे देशील डोळ्या खाली काळी वर्तुळे येतात. त्यासाठी आपल अंतर्गत आरोग्य निरोगी हव.

ताणतणाव

आजकालच्या स्पर्धे च्या युगात प्रचंड धावपळ आहे. धावपळीमुळे ताण येतो, त्यामुळे चिडचिड होते मानसिक आरोग्य खराब होत. त्याच परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. ताणतणावमुळे झोप पण पुर्ण होत नाही त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. सतत काम करणं टाळा.

अनुवंशिकता

काही जणांना काळी वर्तुळे ही अनुवांशिक असतात. त्यांच्या आई वडील ह्यांच्या कडून त्याना भेटतात. अनुवांशिक असल्यामुळे लवकर ही समस्या कमी होत नाही. त्यासाठी तुम्ही अगोदर पासूनच डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. Home remedies for dark circle in marathi

प्रदूषण

वाढत चालेल्या प्रदूषणमुळे देखील चेहऱ्यावर काळी वर्तुळ येतात. चेहऱ्यावरील छिद्रामध्ये घाण धूळ जमा होते. त्यानीदेखील डोळ्या खाली काळी वर्तुळ येतात.

हे पण वाचा – Homemade face pack in marathi

घरगुती उपाय | Home Remedies For Dark Circle

काळी वर्तुळ कशामुळे येतात हे आपण बघितला आहे. त्याची कारणे बघितले की त्यावर उपाय काय हे सुद्धा जाणून घेतल. आता काही घरगुती उपाय करून आपण डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करू कशी करू शकतो हे माहित करून घेऊ.

1. Green tea ice pack

ग्रीन टी मध्ये कॅफीन आणि टॅनिन असतं जे डोळ्यासाठी फायदेशीर असतं ते डोळ्याभोवती रक्तवाहिन्यांना संकुचित करण्यात मदत करते. ग्रीन टी मुळे त्वचेवर निखार व चमक येते. ग्रीन टी मुळे डोळ्याखाली असलेला पफीनेस कमी होतो.

Step 1 – एका वाटीमध्ये थोडी ग्रीन टी घ्या,त्यात थोडं पाणी मिळवून फ्रिज मध्ये ठेवा.

Step 2 – बर्फ जमल्यानंतर, बाहेर काढा.

Step 3 – त्याने डोळ्याभवती गोलाकार मसाज करा.

2 Rose water serum

गुलाब पाण्यामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटीबॅक्टरील गुण असल्यामुळे प्रदूषणने जी डोळ्या खाली घाण जमा होते ती साफ करण्यास मदत होते. गुलाबजल डोळ्यांना थंडावा देते. व्हिटामिन इ ज्याला beuaty vitamin सुद्धा म्हणतात. व्हिटॅमिन इ डोळ्याच्या पेशींना डॅमेज होण्यापासून सरंक्षण देते.

Step 1 व्हिटॅमिन E कॅप्सूलचे दोन ते चार थेंब घ्या.

Step 2 नंतर त्यामध्ये तीन ते चार थेंब गुलाबजलचे घेऊन चांगल मिक्स करा.

Step 3 मिक्स झाल्यावर गोलाकार डोळ्याला 10 मिनिट मसाज करा.

3. Potato pack for eye

बटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग चे गुणधर्म असल्यामुळे ते डार्क सर्कल ला कमी करण्यात मदत करतात शिवाय त्वचेचा रंग उजळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतात. बटाट्याची काप डोळ्या खाली 10 ते 15 मिनिट ठेऊन नंतर चेहरा थंड पाण्याने साफ करावा.

Step 1 एक बटाटा घेऊन त्याच रस काढा.

Step 2 बटाटयाच्या रस मध्ये एक चमचा गुलाबजल व एक चमचा एलोवेरा जेल टाका.

Step 3 ह्या मिश्रण मध्ये कापसाचा बोळा घालून डोळ्यावर ठेऊन द्या.

Step 4 नंतर 15मिनिट ने डोळे थंड पाण्याने स्वच्छ साफ करावे.

4. टोमॅटो पॅक

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. टोमॅटो मधील लायकोपिन नावाच घटक असत, जे त्वचेचेसाठी चांगल असत. लायकोपिन ने त्वचा मऊ होते तसचे डोळ्याखालचे काळे डाग कमी करते. टोमॅटो मध्ये ब्लीचिंग गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावरील डाग नाहीशे होता.

step 1 टोमॅटो चा रस घ्या त्यात एक चमचा लिंबू चा रस टाका.

Step 2 त्या रसामध्ये कापसाचा बोळा भिजून ते डोळ्यावर तसाच 10 मिनिट ठेऊन द्या.

Step 3 नंतर 10 मिनिट ने बर्फने गोलाकार फिरवा.

5. काकडी चा पॅक

काकडीच रस चेहऱ्याला थंडावा देतो. तसेच काकडीच्या रसामुळे चेहऱ्याला ताजेतवाने दिसण्यास मदत होते. काकडीचा रस डोळ्याखालील सूज कमी करण्यास मदत करतो.

Step 1 काकडीचे काप करून घ्या व थोडावेळ ते फ्रिज मध्ये ठेवा.

Step 2 काप फ्रिजमधून काढून घ्या आणि ते डोळ्यावर 10 ते 15 मिनिट ठेऊन द्या.

6. कापूर पॅक

कापूर मुळे डोळ्याची दृष्टी सुधारण्यात मदत होते, तसचे कापूर मुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. कापूर मुळे चेहरावरचे डाग कमी होतात. डोळ्याखालील काळ्या वर्तुळ साठी कापूर फायदेशीर आहे.

Step 1.सर्व प्रथम कापूर ची बारीक भुकटी करून घ्या.

Step 2. नंतर त्या भुकटी मध्ये थोड खोबरेतेल टाकून मिक्स करून घ्या.

Step 3. ती पेस्ट डोळ्याखाली लावा, नंतर 10 मिनिट ने साफ करा.

7. हळदी पॅक

हळदी ही आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. हळदीमध्ये असलेल्या अँटीमायक्रोबिल गुणधर्ममुळे चेहऱ्यावरील डाग कमी होता. डोळ्या खालचे डाग सुद्धा हळदी च्या उपयोगाने कमी होतात. हळदीच्या नियमित वापराने चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते.

Step 1 एक चमचा हळदी घ्या व त्यात एक चमचा गुलाबजल टाका.

Step 2 मिक्स झाल्यावर त्याची पेस्ट डोळ्याखाली हळुवार लावा.

Step 3 पॅक सुकल्यावर थंड पाण्याने डोळे साफ करा.

Hydrating Juice For Healthy Eye

दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याची गरज असते. भरपूर पाणी पिऊनसुद्धा आपण स्वतःला हायड्रेटेड ठेऊ शकतो. दिवसातून 8 ते 9 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हायड्रेटेड ड्रिंक बनून सुद्धा आपण निरोगी राहू शकतो. हे हायड्रेटेटिंग ड्रिंक चव वाढवता शिवाय त्यातून आपल्याला इलेकट्रोलाइट, सोडियम, मिनरल्स, व्हिटॅमिन मिळतात.

1.लिंबू आणि काकडीचा ज्युस

2. नारळ पाणी

3. एलोवेरा ज्युस

4. संत्री चा ज्युस

5. फ्रुटस ज्युस

6. लेमन आणि मध ज्युस

7. हर्बल टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *