khatro ke khiladi season 10 winner
खतरो के खिलाडी सीजन 10 च्या विजेता ची घोषणा झाली आहे विजेते ची ट्रॉफी करिष्मा तन्ना ने कोरिओग्राफर धरमेश ला मागे सोडत तिने आपल्या नावी केली आहे. एक स्टंट करताना करिष्मा तन्ना ने ही ईच्छा बोलून दाखवली होती की तिला ट्रॉफी जिंकायची आहे. तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. खतरो के खिलाडी च हे सीजन खूप पॉप्युलर राहिला. सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची भरभरून मने जिंकली. करिष्मा तन्ना ठरली खतरो के खिलाडी सीजन 10 ची विजेता.
KKK10 चा सीजन खूपच मनोरंजक होता परंतु कोरोना संसर्गाच्या वाढीमुळे तो मध्येच थांबवला. सरकार ने अनलॉक प्रकिया सुरु झाल्यानंतर शो चे भाग प्रसारित केले गेले. ह्या कार्यक्रम चा अंतिम भाग शनिवारी रात्री 8 वाजता प्रसारित झाला ज्यामध्ये रोहित शेट्टी ने विजेता चे अधिकृत नाव घोषित केले.