My family my responsibility

My family, my responsibilities वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कोरोना च प्रसार उच्चभ्रू वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. जवळपास 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून येत आहेत.

मुंबईत आणखी 5 ते 6 हजार बेडस उपलब्ध करून देऊ शकतो. पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार तसेच ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची आणखीन गरज पडणार आहे. राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीत जास्त प्रमाणात वैद्यकीय उपचारासाठी उपयोगात आणणे असे आदेश काढावे लागतील . गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 ह्यासंख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे. कोरोना शी लढा देण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे.

लोकांनी स्वतःहून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याला त्यादृष्टीनं जागृती करणे आवश्यक आहे.सार्वजनिक तर ठीक आहे, पण वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्व देणे गरजेचे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत काही दुष्परिणाम दिसत आहेत. मात्र, हे दुष्परिणाम कोविडचे आहेत की जे औषधोपचार केले आहेत. त्याचे आहेत की दुसरे कशाचे हेही पाहिले पाहिजे. लोकांना अस वाटत की जम्बो रुग्णालयांत त्यांना उपचार मिळणार नाही पण वास्तविक पाहता जगात जे काही उपलब्ध आहे त्या डायलिसीस, आयसीयूच्या उत्तम सुविधा याठिकाणी आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांत जे आहे ते सर्व याठिकाणी असून पालिकेने अतिशय उत्कृष्ट दर्जाची सुविधा, डॉक्टर्स याठिकाणी दिल्या आहेत.

ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधणे आणि 48 तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणे खूप आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासोबत आज बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत. My family, my responsibilities.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *