Educational policy 2020

केंद्र सरकार ने बुधवारी देशाच्या नवीन शैक्षणिक धोरण ला मंजुरी देण्यात आली. तब्बल 34 वर्षाने देशाच शैक्षणिक धोरण बदलण्यात आल आहे. (New educational policy 2020) ह्या 2022-2023 शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होईल.

भावी पिढ्यांच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी देशाचं नवीन शैक्षणिक धोरण ( new educational policy 2020 )जाहीर केले. त्यात पाचवीपर्यंत मातृभाषेत शिक्षण देणे. सायन्स, आर्टस् आणि कॉमर्स असा फरक राहणार नाही. मुलांना सगळे विषय शिकण्याची सोय राहणार आहे. सर्वच विद्यापीठांना एकच मापदंड. 10+2 ऐवजी आता 5+3+3+4 हा पॅटर्न लागू करत बोर्डचे महत्व कमी करण्यात आले आहे. लॉ आणि वैद्यकीय शिक्षण वगळता उच्च शिक्षण एकाच छताखाली येणार आहे.

मुलांच्या अभ्यासाचं भार कमी करून त्यानं आणखीन बनवणे हा त्यामागचं उद्धेश आहे. आठ प्रमुख भाषांमध्ये इ – अभ्यासक्रम असणार आहे. शाळा, कॉलेज, विद्यापीठ साठी नवे नियम ठरवण्यात आले आहे. त्याशिवाय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ ठेवण्यात आले आहे.

New educational policy 2020 चे काही ठळक वैशिष्ट्ये -:

 1. पाचवी पर्यंत मातृभाषेत शिक्षण देणे अनिवार्य असेल.
 2. खाजगी व सार्वजनिक विद्यापीठांना एकच मापदंड
 3. आठ भाषांमध्ये असलं आता इ -अभ्यासक्रम.
 4. एम फिल ची पदवी आता कायमची बंद करण्यात आली.
 5. 10+2 ऐवजी 5+3+3+4 नवीन पॅटर्न.
 6. पदवी + एक वर्षाचा मास्टर अभ्यासक्रम अशी चार वर्षाची पदवी असले.
 7. ‘पारख ‘ या नव्या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेची स्थापना.
 8. प्रौढ साक्षरते वर भर देण्यात येणार आहे त्यासाठी राष्ट्रीय मिशन राबविण्यात येणार.
 9. संशोधन ला प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल रिसर्च फॉउंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे.
 10. दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल असे शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे.
 11. कला, क्रीडा, संगीत, योग, समाजसेवा या सर्व विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे.
 12. उच्च शिक्षणासाठी एकच नियामक मंडळ असणार.
 13. जगातील 100 विद्यापीठांना भारतात प्रवेश देण्यात येणार.
 14. मुलींसाठी लैगिंक शिक्षण कोष तयार करण्यात येणार.
 15. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वयोमर्यादेत वाढ केली.

5+3+3+4 पॅटर्न आहे तरी कसा?

 • 5 वर्ष – वय 3-8 वर्ष – पूर्व प्राथमिक 3 वर्ष इयत्ता पहिली ते दुसरी
 • 3 वर्ष – वय 8- 11 वर्ष – प्राथमिक शिक्षण इयत्ता तिसरी ते पाचवी
 • 3 वर्ष – वय 11-14 वर्ष – पूर्व माध्यमिक शिक्षण इयत्ता सहावी ते आठवी
 • 4 वर्ष वय 14- 18 वर्ष – माध्यमिक शिक्षण इयत्ता नववी ते बारावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *