वाटचाल भविष्याकडे | online education

आज आपण सगळे कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलो आहे. सर्वत्र कोरोना विषाणु चा संसर्ग पसरला आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने ह्या संसर्गाशी लढत आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी मुलांसाठी शाळेचा दार उघडले नाही. ह्या अश्या परिस्तिथीमध्ये मुलांचे शिक्षण सुरु राहावे म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा ( online education in india ) प्रयत्न सगळीकडे सुरु आहे. ह्या अश्या परिस्तिथी मध्ये आपल्याला अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणाला लागणाऱ्या सुविधा आपल्याला मिळत नाही म्हणून मुलांमध्ये डिप्रेशनच प्रमाण वाढत आहे. ह्याचाच ताजा उदाहरण आहे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील दहावी च्या विद्यार्थ्यांन आत्महत्या (sucide ) केली. सध्याच्या काळात विद्यार्थीच्या आत्मह्त्येकड़े गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एकच तर आत्महत्या (sucide ) झाली म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ही तर सुरवात आहे, हे सर्वांनी लक्षात घायला हवं. अपुऱ्या सुविधे अभावी हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ह्यासाठी सरकारसोबत विविध प्रकारच्या सामाजिक संस्थानी देखील सहभाग घ्यावा.

ऑनलाईन शिक्षण (online education ) म्हणजे काय?

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय तर इंटरनेट च्या माध्यमातून शिकवलं जाणारा अभ्यासक्रम. ह्यामध्ये व्हिडीओ क्लिप्स, ऑडिओ clips, प्रेसेंटेशन, लाईव्ह लेक्चर ह्यासगळ्या माध्यमातून अभ्यासक्रमाची माहिती सांगितली जाते. चालू शैक्षणिक वर्षात शाळेचे वर्ग बंद असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थांचे शिक्षण सुरुळीत हयावे ह्याकरिता विविध ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग भरवण्याची सुविधा उपलब्ध करू पाहत आहे.ह्यासाठी विध्यार्थ्यांना लागणारी वस्तू म्हणजे अँड्रॉइड मोबाईल फोन त्यामध्ये इंटरनेट सुविधा. हे सर्व आजच्या परिस्थिती मध्ये मुलांना देणे हातावर पोट असलेल्या पालकांना अवघड जात आहे. हातावर पोट असलेले लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहे ह्यात त्यानं शिक्षणासाठी सुद्धा संघर्ष कराव लागत आहे. त्यांच्याकडे मोबाईल आहे ते शिक्षण घेऊ शकत आहे पण ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांचं काय आहे त्यांचा कोणी विचार केला का? शिक्षण हे सर्वांना सारखी व उत्तम दर्जाचे मिळाले पाहिजे पण आर्थिक विषमता इतक्या खोल पातळीवर गेली आहे की आपल्याला शिक्षण मिळेल हा विश्वास या गरीब विद्यार्थ्यांना मिळू शकत नाहीये म्हणून हे विद्यार्थी स्वतः ला संपत आहे स्वतःचे आयुष्य उध्वस्त करत आहे. आत्महत्या अशे विचार विद्यार्थ्यांच्या मनात यायला नकोय स्वतःला संपवणे हाच एक पर्याय नाहीये. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काय हवय हेच माहीत नसल्यामुळे ते हा मार्ग निवडत आहे.

शिक्षण म्हणजे केवळ कविता पाठ करणे धडा वाचणे एवढे नव्हे. शिक्षणातून त्यांना परिस्थितीशी कसं लढायचं हे शिकवलं पाहिजे यासाठी सामाजिक संस्थेने सरकारने पुढाकार घ्यावा. स्वतःचे आयुष्य आयुष्यात दुसरे काहीच महत्वाचे नाही हा विचार त्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना समजून घेतले पाहिजे त्यांच्याशी बोलले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अवतीभवती काय घडत आहे त्याचा विचार करावा. वर्तमानपत्रे वाचावे, पुस्तके वाचावी, दूरदर्शन आकाशवाणी हे सुद्धा अभ्यासाची माध्यमे आहे. माझं व्यक्तिगत मत असा आहे की मुलांनी आई-वडिलांसोबत संवाद करावा आपल्या मनातल्या गोष्टी त्यांनी आई-वडिलांना सांगावे आपल्या अवतीभवती काय चाललंय याचं निरीक्षण करावं निसर्गातून आपण भरपूर काही शिकू शकतो. लहान मुलं हे फुल असतात त्यांना हळूहळू उमलू द्या. त्यांना एखाद्या चित्राचा निरीक्षण करू द्या चित्रावरून गोष्टी तयार करू द्या त्यामुळे मुलांची कल्पना करायची शक्ती वाढेल. गोष्टीचा जास्त विचार करू लागतील. नवीन गोष्टी शिकतील. ही विषमता दूर करायची असेल सामाजिक संस्थांनी सरकारने पुढे येऊन विश्वासात घेतलं पाहिजे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *