वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार परिषद प्रकरणी शरद पवार यांना बनावट कागदपत्रे जनतेसमोर आणावी व एल्गार परिषदेत प्रकरणी परत फेरतपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने एल्गार परिषद प्रकरणी राजकारण करून एल्गार परिषदेचा तपास चुकीच्या पद्धतीने केला, एल्गार परिषदे वेळी राज्यात RSS चे सरकार होते त्यामुळे त्यांनी ह्या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने केला आहे.prakash ambedkar
2018 सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी .सावंत यांनी एल्गार परिषद आयोजित केली, त्यावेळी राज्यात RSS चे सरकार होते , त्यानंतर आता महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एल्गार परिषद प्रकरणी फेरतपास करण्याची मागणी केली आणि केंद्र सरकारने राज्याकडून तो तपास काढून घेतला .शरद पवार मागणी केली त्याची त्यांच्याकडे या प्रकरणी काही पुरावे असतील तसेच शरद पवार हे भाजपच्या विरोधात आहेत हे गृहीत धरून त्यांनी ते पुरावे जनते समोर मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदीचे लोकशाही विरोधी कारस्थान जगासमोर आणावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले .prakash ambedkar