Skin care tips in marathi

सध्याच्या धावपळीच्या जगात स्वतःची त्वचे ची काळजी कशी घ्यावी? skincare tips आपली त्वचा कशी आहे ओली कोरडी की तेलकट असे खूप प्रश्न आपल्याला पडता. वाढत चाललेल्या वयामुळे महिलांना त्वचा संबंधित तक्रारी असतात. वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात पिंपल्स येणे चेहऱ्याची चमक कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. याव्यतिरिक्त हार्मोनल इम्बॅलन्स, टँनिंग , कॉस्मॅटिक प्रॉडक्टच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा चेहऱ्याची चमक कमी होते. काही सोप्या पद्धतीने आपण आज बघनार आहोत त्वचे ची काळजी कशी घ्यावी| Homemade face pack in marathi

भरपूर पाणी प्या -:

पाणी फक्त तुम्हाला निरोगी ठेवत नाही तर तुमची त्वचा चमकते. जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा शरीरातील विषारी घटक आहे ते बाहेर पडण्यास मदत होईल त्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिल्याने तुमच्या चेहर्‍यवर ओलावा राहतो.

निरोगी आहार घेणे -:

जेव्हा अंतर्गत आरोग्य निरोगी असेल त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो चेहऱ्याला तजेलदार ठेवण्यासाठी निरोगी राहण्याचा वर भर दिला पाहिजे. आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. आपल्या आहारात पोषक घटकांचा समावेश करा. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विटामिन्स c युक्त आहार घयावा.

कसरत करा -:

चेहऱ्याला चकाकी मिळवण्यासाठी एक्सरसाइज हादेखील एक सोपा मार्ग आहे जेव्हा आपण कसरत करतो तेव्हा त्वचेत रक्तप्रवाह संचार होतो. ज्यामुळे त्वचेला चकाकी येते. कसरत मुळे आपली तक धरण्याची क्षमता देखील वाढते आणि निरोगी राहण्यास मदत होते.

होम मेड फेस पॅक वापरा -: home made face pack in marathi

काही घरगुती पदार्थ वापरून सुद्धा आपण आपल सौंदर्य उजाळु शकतो.

1.केळी फेस पॅक -: केळी हे त्वचेचेसाठी पौष्टिक आहे. केळीमधील पोटॅशियम आणि ओलावा त्वचेचेला हायड्रेटेड ठेवतं. त्यामुळे त्वचा मऊ व ताजलेदार होते. प्रथम एक केळ घ्यावं त्याला बारीक करून त्याची पेस्ट करावी त्यात थोडं अंड्या मधील जो पांढरा भाग असतो तो मिक्स करावा व्यवस्थित मिक्स झाल्यावर फेस वर लावावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

2. हळदी बेसन फेस पॅक -:

हळदी मध्ये असलेल्या अँटीइंफ्लामेंटोरी प्रॉपर्टी मूळे चेहऱ्याची रोमछिद्रे उघडण्यास मदत होते. हळदी मुळे चेहऱ्याला चकाकी येते. एक चमचा हळद, एक चमच बेसन पीठ घ्यावे. त्यात थोडं कच्च दूध टाकून मिश्रण एकजीव करावा. ते मिश्रण चेहऱ्यावर लावावं नंतर 15 मिनिट ने चेहरा धुवून टाकावा.

3. मुलतानी माती फेस पॅक -: ( multani mati face pack )

मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावर चमक येते. त्वचेचेवर जे अतिरिक्त तेल, घाण, मृत पेशी साफ करून चेहरा साफ बनवते. दही व एलोवेरा मध्ये अँटिऑक्सिडंट गुण असल्याने जे त्वचेचेवरचे दाग धब्बे कमी करून चेहऱ्यावर चमक आणतो. पॅक बनवण्यासाठी प्रथम एक चमचा मुलतानी माती घ्या त्यात एक चमचा दही टाका चांगलं मिक्स करून घ्या. मिश्रण नीट मिक्स झाल्यावर त्यात थोड एलोवेरा जेल टाका परत मिश्रण चांगल मिक्स करून घ्या. चेहरा साफ करून त्यावर हा पॅक लावा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

4.बदाम फेस पॅक -: ( almond face pack )

बादममध्ये व्हिटॅमिन इ आणि इतर पोषक तत्व असल्यामुळे ते त्वचेचेला मॉईशराईझ करते. खूपजणांचं उन्हामुळे चेहरा टॅन होतो पण ह्या बदाम फेस पॅक ने चेहरा टॅन होण्याच्या त्रासपासून तुम्ही वाचू शकता. त्यासाठी रात्री 5 ते 6 बदाम पाण्यामध्ये भिजून ठेवावे, दुसऱ्यादिवशी दूध टाकून त्याची पेस्ट बनवावी. ती पेस्ट चेहऱ्याला लावावी. चेहरा सुकल्यावर पाण्याने चेहरा साफ करून घयावा.

5. बटाटा फेस पॅक –: ( potato face pack )

बटाटा चा फेस पॅक हा चेहऱ्यासाठी उत्तम आहे. बटाटा हा एक उत्तम अँटिऑक्सिडंट आहे जे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकते बटाटा मध्ये ब्लॅचिंग प्रॉपर्टी असल्यामुळे चेहरा गोरा होण्यास मदत होते. मध हे त्वचेला मऊ बनवते. त्यासाठी बटाटयाची पेस्ट बनवून त्यात मध टाकावे. ही पेस्ट चेहऱ्यला लावावी. सुकल्यावर पाण्याने साफ करावी.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *