Teera kamat news

Teera kamat news | असे आहे तीरा कामत प्रकरण

मुंबईमधील एसआरसी रुग्णालयात दुर्मिळ आजाराने ग्रस्त तीरा कामत हे प्रकरण अचानक चर्चेत आले जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीनी तीच्या 16 कोटी च्या इंजेक्शन वर 6 कोटीचा कर माफ केला. अवघ्या सहा महिन्याची तीरा प्रत्येक दिवस आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. Teera kamat news

स्पाइनल मस्क्युलर अँट्रोफी (एसएमए) परिणामी स्नायूंचा अपव्यय आणि अशक्तपणा होतो. स्पाइनल मस्क्युलर अँट्रोफी हा मज्जातंतू शी निगडीत आजार तिराला झाला आहे. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. आपल्या शरीरात प्रथिने तयार करणारी एक जनुक असते हे स्नायू आणि नसा जिवंत ठेवते मात्र तीराचा शरीरात हे जनुक नाही. एसएमए ग्रस्त एखाद्यासाठी, उभे राहणे, चालणे आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे फार कठीण आहे. एसएमएच्या काही तीव्र स्वरूपामुळे श्वास घेण्यास आणि गिळण्यास असमर्थता देखील उद्भवू शकते . एसएमए एकतर जन्माच्या वेळी उद्भवू शकतात किंवा जीवनाच्या टप्प्यावरही दिसू शकतात आणि एसएमएच्या गांभीर्याने आणि प्रकारानुसार ते एखाद्याच्या आयुर्मानावर परिणाम करू शकतात.Teera kamat news

तिरा च्या एका फुफुस्याने काम करणे थांबवले आहे तेव्हापासून ती व्हॅन्टिलेटर वर आहे गंभीर अवस्थेमुळे तिला उपचारासाठी परदेशात नेणे देखील धोकादायक आहे. या आजारावर उपचारासाठी अमेरिकेत झोलगेनस्मा ( zolgensma )नावाचे इंजेक्शन तयार केले आहेत जगातील सर्वात महागडे औषधांमध्ये त्याचा समावेश आहे 16 कोटीचे इंजेक्शन द्यावे लागते त्यामुळे स्नायू बळकट बनतात त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते आणि आयुष्य वाढते. इंजेक्शनची एवढी किंमत पाहता तीराच्या आई-वडिलांनी क्राउड फंडिंग चा पर्याय निवडला त्याद्वारे सुमारे 16 कोटी रुपये जमवले आहे याची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली तिरा फाईट एसएमए नावाने इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज तयार केले PMO कडे कर माफीची मागणी केली. पंतप्रधान मोदींनी तिच्या 16 कोटीचे इंजेक्शन वर 6 कोटीचा कर माफ केला.

हे पण वाचा टाचदुखीमागे असू शकतात ही कारणे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *