Prakash ambedkar

औरंगाबाद येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषद मध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाऊन ला कडक विरोध दर्शवला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील नेत्यांमध्ये राजकीय नेतृत्व करण्याची धमक नाही. नरेंद्र मोदी हे धार्मिक नेते आहे त्याच्यात राजकीय नेतृत्व करण्याची धमक नाही. कोरोना सारख्या महामारीतून बाहेर येण्यासाठी नेत्याकडे दृष्टिकोन नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषद मध्ये केला.

कोरोनामुळे चार महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे, त्याच सामान्य लोकांवर भयंकर परिणाम होत आहे, लोकांवर उपासमारी ची वेळ आली. देशाची अर्थव्यवस्था पुर्ण ठप्प झाली. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 5% लोकांना कोरोना चा धोका होत आहे त्यामुळे उर्वरित 95% लोकांना का वेठीस धरले जात आहे. ज्या 5% लोकांना धोका आहे त्यांच्यावर सरकार ने लक्ष द्यावे असा सल्ला त्यानी दिला.

पत्रकार परिषद मध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्व सामान्यांना जनतेला माझे आवाहन आहे की कोरोनाच्या चक्रव्यूहात स्वतःहून अडकलेल्या सरकार ला बाहेर पडण्याचा रस्ता दाखवा. राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे ती रुळावर आण्याची जबाबदारी सरकारची नाही तर जनतेची आहे. त्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी सरकारचे जे नियम आहे त्याचे पालन करून जनजीवन पूर्वपदावर आणावे.

शनिवारी ईद असल्याने त्यानी मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तीन तारखेला रक्षाबंधन आहे त्यासाठी राज्य महामंडळ च्या बस सुरु कराव्यात. लोकांना त्याचे सण साजरे करू द्या. आम्हाला आता लॉकडाऊन मान्य नाही हे दाखवण्यासाठी लोकांनी आपल्या घरावर आपण जो झेंडा मानत असाल तो फडकावा. देशाचा झेंडा तिरंगा फडकावला तर अधिक चांगला आहे. ह्यातून सरकार ला दाखून द्या की आम्ही कोरोनाला हरवला आहे, आणि आता आम्हाला लॉकडाऊन मान्य नाही असा आवाहन वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *